त्या दिवशी माझ फ़्रेंड
रडत रडत आला
माझा बाबा बाप्पाकडे गेला
म्हणत मला गच्च बिलगला
मीही हादरलो क्षणभर
अन सावरलोही क्षणात
असा कसा बाप्पा करेल म्हणत
हसलोही मनात
समजावलं त्यालाही असं नाही बाप्पा करणार
गम्मत केलि असेल तुझी
उद्या तुझा बाबा तुला नक्कि परत करणार
दिवस सरले
आठवणी विरल्या
माझ्या लहानश्या जगात
आता माझा बाबाच माझा सर्वस्व झाला
.
.
.
आज मात्र कोण जाणे
बाबा अजुन आला नाही
खाउ आणण्याचं प्रोमिस तो विसरणार तर नाही
दार वाजतय बहुदा बाबा आला
घाबरलेल्या शेजारच्या काकु
हे काय सांगताहेत
रेल्वेमध्ये म्हणे कोणी मोठा बोम्ब ठेवला
त्या बोम्ब्सोबतच बाबा माझा बाप्पाकडे गेला
अश्या कशा काकु खोटं बोलताहेत
ताइपण वेडी माझी टिहि ओक्सबोक्षी रडतेय
बाप्पाकडे त्याचा बाबा असताना तो माझ का नेइल
आईच्या कुशित शिरल्यावर मात्र सगळं काहि कळलं
वर बसलेला हा बाप्पा गंमत नसतो करत
एकदा घेउन गेल कि बाप्पा बाबा परत नसतो करत
रडत रडत आला
माझा बाबा बाप्पाकडे गेला
म्हणत मला गच्च बिलगला
मीही हादरलो क्षणभर
अन सावरलोही क्षणात
असा कसा बाप्पा करेल म्हणत
हसलोही मनात
समजावलं त्यालाही असं नाही बाप्पा करणार
गम्मत केलि असेल तुझी
उद्या तुझा बाबा तुला नक्कि परत करणार
दिवस सरले
आठवणी विरल्या
माझ्या लहानश्या जगात
आता माझा बाबाच माझा सर्वस्व झाला
.
.
.
आज मात्र कोण जाणे
बाबा अजुन आला नाही
खाउ आणण्याचं प्रोमिस तो विसरणार तर नाही
दार वाजतय बहुदा बाबा आला
घाबरलेल्या शेजारच्या काकु
हे काय सांगताहेत
रेल्वेमध्ये म्हणे कोणी मोठा बोम्ब ठेवला
त्या बोम्ब्सोबतच बाबा माझा बाप्पाकडे गेला
अश्या कशा काकु खोटं बोलताहेत
ताइपण वेडी माझी टिहि ओक्सबोक्षी रडतेय
बाप्पाकडे त्याचा बाबा असताना तो माझ का नेइल
आईच्या कुशित शिरल्यावर मात्र सगळं काहि कळलं
वर बसलेला हा बाप्पा गंमत नसतो करत
एकदा घेउन गेल कि बाप्पा बाबा परत नसतो करत
No comments:
Post a Comment