Friday, May 18, 2012

निर्धार


सगळचं नेहमी मनासारखं होईल
अशी अपेक्षाच करायची नसते
मनातलं ते स्वप्न तुटलं म्हणुन
रडत बसायचं नसतं

अथांग समुद्रासारखं दुःख असलं
तरी सुखाच्या किनार्याला विसरायचं नसतं
आकाशाच्या निळाईला गवसणी घालताना
जमिनीवरच्या अस्तित्वाला विसरायचं नसतं

अपयश आलं म्हणुन
प्रयत्न करणं सोडायचं नसतं
नव्या वाटेवर नवी संकटं
म्हणुन चालणं सोडायचं नसतं

No comments:

Post a Comment