Friday, May 18, 2012

उसी गली के उसी नुक्कड पे-3


कोर्नर का वो लंबासा लम्पपोस्ट
और उसके निचे खडा छोटासा वो..
अपने सपनोंकी उंचाई नापता हुआ..
कुछ अजीबही चमकति थी उसकी आंखे
उस उंचे लम्प की पीली रोशनीमे..
एक अलगही चाह थी उसे..
और..
और..
हा और शायद इंतजार था उसे..
ना ना... कोई मेहबुबा ना थी
ना ही ये कोई आशिक़ था..
वो इंतजार तो बस अपने मौत का था..
कहने को तो पागल कह भी देते लोग उसे..
उलझे हुए सवालोंमे सुलझा हुआ पागल..
सतरंगी ख्वाब देखनेवाला जिद्दी पागल...
हर एक पल मर्जीसे जीनेवाला पागल...
और्..
मौत की चाह मे सांसे गिनता वो पागल..
.
.
.
.
.
.
लेकीन किसी ने कुछ ना कहा..
शायद उन मे भी कही छुपा था
वो पागल.......
और शायद इसीलिये.....
.
.
.
.
.
उसी गली के उसी नुक्कड पे
वो आज भी खडा है..
सपनो से भरा उसका हर पल
उस इंतजार मे जीता हुआ

उसी गली के उसी नुक्कड पे-2


वैसे तो हमेशा ही भीड होती थी
उसी गली के उसी नुक्कड पे
वो फिरभी रहा अकेला
अपनेमे ही खोया हुआ..हमेशा..
कभी हसता था..
कभी गाता भी था..
अपने ही धुन मे ना जाने
क्या क्या छुपाता था..
दर्द तो देखा है 
हरेक ने उसकी आंखोमे
गम का वो आसु लेकीन
न जाने कहा छिपाके रखा था
उसे मिले हर शख्स के मन मे 
रहा हमेशा एक सवाल
उसकी हसी मे छिपे उस सन्नाटेका
दर्द से भरी उन मुर्दा आखोंका..
और्..और् ...
उससे जुडे उसके खालीपनका..
किसीने पुछा होता तो शायद जवाब मिलता..
पर..शायदही.. क्योंकी..
.
.
.
.

उसी गली के उसी नुक्कड पे
वो आजभी खडा है
थोडा घबराया...थोडा सहमासा.

उसी गली के उसी नुक्कड पे-1


उसी गली के उसी नुक्कड पे
वो दिखता था कभीकभी
थोडा घबराया...थोडा सहमासा..
न जाने क्या खोया है उसने
जो ढूंढता है दिनरात
कभी खुले आसमान मे
तो कभी कोने मै फ़ैली उस रेत मे
आते जाते लोग देखते थे उसे
कुछ हसते थे..कुछ रोते भी थे
पर ना पुछा किसिने के
"बाबा क्या ढुंढ रहे हो?
खोया हुआ बचपन
गुजरी हुइ जवानी
या...या...आनेवाला कल?"
पुछते तो शायद जवाब मिल जाता
उन खाली आंखोमे छिपे सवालोंका
जिसे वो अक्सर ढुंढा करता था
उन टुटे तारोंमे..पत्थर की लकिरोमे...
लेकिन्....
.
.
.
.
.
उसी गली के उसी नुक्कड पे
वो आजभी खडा है
थोडा घबराया...थोडा सहमासा..

आभाळ


फाटलेलं आभाळ आता तुझं तुच जोडायचं
ठिगळं हसण्याचे की पुन्हा आसवांचे तुझं तुच ठरवायचं

त्या आभाळाच्या भाळी बघ नशिबं कित्येकांची
भाग्यवान तशी कमीच बाकी फुटकीच बरीचशी

आभाळ सांधताना निसटेल चुकार तुकडा
जाता जाता उगा तोही करेल घाव उघडा

फाटक्या त्या आभाळातुन देवही बघेल कधी
फरफट त्याच्या लेकराची बघता रडेल तोही कधी

सभोवार विखुरले क्षण आनंदाचे तुझे तुच वेचायचे
आठवांच्या आसवांना दुर आता तुझे तुच सारायचे

मी चुकतेय का रे?


नजरेत भरलेला वैताग
ओठात अडकलेली जुनीच तक्रार
डोक्यात कोंडलेला राग
अन् तरी मनाचा हळवा विश्वास
सांग मी चुकतेय का रे?
नशिबाच्या रेषांत गुंतलेले हात
नात्यांच्या भोवर्यात अडकलेला पाय
पत्ता हरवलेली सारी वाट
अन् तरी मुक्कामाचा मनी ध्यास
सांग मी चुकतेय का रे?
आरशातला तो अनोळखी चेहरा
नकोनकोसा तरी चढवलेला मुखवटा
विस्कटलेला डाव सारा
अन् तरी सारं सारं सांधायाची आस
सांग मी चुकतेय का रे?
तुला कळत होते ना हे सारे बदल
बदलत गेलेलं सारं समिकरणं
नव्या समिकरणांचे जुनेच प्रश्न
अन् तरी…
सारं उत्तरण्याचा माझा वेडा अट्टाहास
आता तरी सांग मी चुकतेय का रे?

नाते


हळव्या नाजुक वळणावरचे
अवघडलेले नाते
भावबोलक्या डोळ्यांमधले
अवखळ अबोल नाते


अव्यक्त शब्दांमधले
कधी कविता होई नाते
सप्तसुरांच्या सुरावटीतले
कधी गाणे होई नाते


पेटत्या वैशाख वणव्यात
लीवळीव सर होई ते ना
तेनिसरड्या पाउलवाटांवर
च्याआधारपारंब्यासम नाते


घट्ट मिठीत चुकां
च्याकधी कठोर होई नाते
ओघळणार्या दोन आसवांस
 मोत्यांसम जपणारेही नाते


नव्या वळणावर नव्या तर्हेने
उलगडणारे नाते
कळुनही न कळलेले
एक रहस्य म्हणजे नाते

लेक


कशी इवलिशी लेक माझी
आज नववधू गं जाहली
भातुकली ती खेळातली
खरी मांडाया निघाली..
इवलिश्या तिच्या हाती
कधी फुले पारीजात
आज गंध गुलाबात न्हाहे
तिची वेडी हळवी प्रीत
कशी अवखळ बोलकी
लेक झाली ती अबोल
लाज दाटल्या डोळ्यात
आज तिच्या सख्याची चाहुल
कशी जीववेल्हाळ ही पोर
निघे सासुराच्या वाटा
माहेराच्या अंगणात पसरे
तिच्या आनंदाचा ठसा

नकोनकोसे म्हणताना


नकोनकोसे म्हणताना 
पुन्हा गुंतणेच उरते हाती
तोडायचे म्हणतानाही
मन धावते तुझ्याच पाठी
चिवट रे हा बंध नात्याचा
अवघड सोडने ह्या गाठी
खर्या खोट्या खेळात ह्या
रोज हारते मी तुझ्याचसाठी

लपवलेल्या जख्मांचा कधीही
ना बाजार मांडला मी
मनी जपल्या भावनांचा
तसा कोंडमाराच साहला मी
भोगताना भोग माझे 
ना तुला जरी कोसले मी
वेदना येता ओठी 
तुला आठवांत शोधले मी

वाटते कधी मलाही
का नाते असे हे कमनशिबी
क्षणाक्षणाला का जपावे
नवे घाव मी उराशी
समजुन घेताना तुला रे
जरी चुकले मी जराशी
बघ एकदाच फिरुनी
नव्याने एकरुप् होईल तुझ्याशी

देव


काय सांगु बाळा तुला
काय बोचते मला रे
देवपणासही ना चुकले माझ्या
कसे लपवु असंख्य घाव रे

दाटुन आलं आभाळ
की वेडं जग सारं नाचे
रडतो तो बाप्पा तिथे
अन् जग त्या आसवांत न्हाते

दगडातल्या देवाला
का इथे शोधतो तु?
मनाच्या गाभार्यात देव तुझा
का उगा सैरभैर तु?

माझेच जग माझे
मज अनोळखी भासले
निर्मिले मी एक जे
आज असंख्य वाटे जाहले

कुठे शोधिसी मंदिरात
देव का गाभर्यात आहे
बघ रे तु तुझ्यात क्षणभर
देव तिथे सुरक्षित आहे

न रुजलेल्या नात्यांचे


न रुजलेल्या नात्यांचे
मनी जपले बंध अजूनही
अधुर्या त्या वचनांचे
सल बोचरे अजूनही
न सुटले काही प्रश्न
शोध उत्तरांचा अजूनही
निसटलेल्या श्वासांचा
मनी हिशेब अजूनही
निसरड्या वाटांवर
पावलांचे ठसे अजुनही
तोल जाता पुन्हा
सावरल्याचे भास अजुनही
अर्थ त्य मौनांचे
उलगडतात नवे अजुनही
न बोललेले सारे
उगा आठवतं अजुनही
सुटले हात हातातले
तरी आहेस तु माझ्यात अजुनही
बघ डोकावुन माझ्या शब्दात
दिसशील तुच तिथे अजुनही

एकाकी गर्दी..


सगळी शहरं इथली
तशी इथुन तिथुन सारखीच
त्याच रस्त्यांवर् त्याच माणसांची
तीच एकाकी गर्दी..
अंतरं झाली छोटी रस्त्यांची
अन् वाढली दरी नात्यांची
ना कोणाला चिंता वा काळजी
ह्या आटणार्या मायेची
मरणार्यांचा ना शोक क्षणभर
ना नवजन्माचा उल्हासही
जो तो रमला स्वतःमधे
ना थांबला घेण्या श्वासही
माणुसकी रहीलीच नाही तशी
ह्या प्रेतांच्या वस्तीमधे
तरीही घेई रोज जन्म नवा
हा माणुस नव्या गर्भामधे

जगणं


किती ह्या तर्हा
जगण्याच्या…. जगू देण्याच्या…
कुणी स्वतःच्याच जगण्यात हरवलेला
अन् कुणी दुसर्यांसाठी जगुनही नामानिरळा
प्रत्येकाच्या जगण्याची एक चौकट
अन् अट्टाहास त्या चौकटितच जगण्याचा
काही अवलियांचा मात्र ध्यास
ह्या चौकटिबाहेर पडण्याचा
जगणं आपलं हे असं
एका रींगणाभोवती फिरणारं
एक् रींगण सोडता सोडता
पुन्हा दुसर्यात अडकत जाणारं
जगणं तर असतच मरण येइपर्यंत….
जरासं समजुन पहा हे जगण्यापल्याडचं आयुश्य
एकेका श्वासाचं मोल त्या क्षणातच उमगतं
तो क्षण गाठायचा कसा हा
मात्र ज्याचा त्याचा प्रश्न…

मैत्री


आयुश्याच्या प्रत्येक वळणावर
नवे साथीदार नवे सोबती
काही नाती मात्र आयुश्यभर टिकली
बहुदा त्याचेच नाव मैत्री...

खुप बोलले, खुप खेळले तिच्याशी
कधी रागवले, कधी भांडलेहि तिच्याशी
ती मात्र नेहमीच माझ्या शेजारी
बहुदा तिचेच नाव मैत्री....

तारुण्याच्या उंबरठ्यावर एक तो भेटला
अनेक वादळं उठली ह्या समाजबाह्य नात्याची
पण तो मात्र नेहमीच..
माझ्यासोबत.. फ़क्त माझ्यासाठी राहीला
बहुदा ह्याचेही नाव मैत्री

उतरणीला लागलं आयुष्य आता
अन् जोडिदाराची साथही सुटलेली
उरलेल्या श्वासांचे हिशेब करायल एक नवी सोबत मिळाली…
बहुदा तिचेही नाव मैत्री...

प्रत्येक वळणावर प्रत्येकवेळी एक
नवा अर्थ घेउन आलि हि मैत्रि
सुखाच्या अन् दुःखाच्या प्रत्येक क्षणात
वाटेकरु झालि ही मैत्री
आयुश्यभर पुरुनही
मनात अजुनहि कोवळि ती मैत्री
खरंतर आयुश्य जगण्याचा
चिरतरुण मंत्र देउन गेली ही मैत्री

आठवतं का रे सख्या तुला


आठवतं का रे सख्या तुला
तुझं ते एकटक माझ्याकडे बघणं
तुझ्या त्या नजरेत विरघळताना
माझं माझ्याही नकळतच लाजणं

आठवतं का रे सख्या तुला
तुझं ते बेभान होउन गाणं
तुझ्या त्या प्रेमाच्या स्वरात
माझं नखशिखांत न्हाणं

आठवतं का रे सख्या तुला
माझं तुझ्यात ते तसं गुंतत जाणं
तुझ्याशिवायच्या त्या एकेका क्षणाचं
मला पुन्हा एकाकी करणं

नको आठवुस तु सख्या आता
आठवेल आपल्या नात्याचं तुटणं
तुझा तो सततचा शोध कारणांचा
अन् माझं नेमकं तेच टाळणं

नको नको म्हणताना आज
पुन्हा सगळं काही आठवलं
तु येताच सामोरा असा अचानक 
गर्दितलं माझं रितेपण मला जाणवलं

न कळले तुला त्या क्षणांचे इशारे


अजब रे मौनातही गुपितांचे उलगडणे
न बोलुन काही तु बोललास सारे

आठवांच्या मैफलीत रंगले सुरेल गाणे
न मागता मिळाले देणं सप्तसुरांचे

शोधुनही न सापडले भास तुझ्या येण्याचे
न पाणावता डोळे वाटे धुसर आसमंत सारे

निघाले अनंताच्या प्रवासी बांधुन श्वास सारे
अजुनही का कळले न तुला रे त्या क्षणांचे इशारे

आता तरी येशील का?


रंगलेला खेळ सारा
चंद्र चांदण्यांचा संपला
रातही विझली सख्या
आता तरी येशील का?

छळते मजला आता
चाहूल तुझ्या पावलांची
भासतुनी सत्यात तू
आता तरी येशील का?

क्षण हळवे मिलनाचे
तू असे टाळू नको
आठवणीत रमताना
तू उगा उसासू नको

मिठीत तुझ्या विराघळण्या
जीव हा आसावला
सावरण्या तुझ्या प्रियेला
आता तरी येशील का?

समजूत…


समजूतदारपणे स्वतःला
समजावण्याची सवय झाली
आताशा तर जरा वेगळी वाटही
टाळायची सवय झाली
जातो परी सामोरे धैर्याने
भीती तरी ना कमी झाली
बंदिस्त माझी चाकोरी प्यारी
तोडायाची ना हिंमत झाली
कोणी म्हणे स्वार्थी तु
तो स्वार्थही आज गरज झाली
फुकट्यांच्या ह्या जगात सार्य़ा
दयेचीही भीक झाली
एकसुरी ह्या जगण्यात आता
मोकळं हसण्याचीही चोरी झाली
वेडं म्हणेल दुनिया सारी
म्हणत भावना ती शुन्य झाली
खोट्या खोट्या मुखवट्याआड
माझं मीपण मी हरवुन गेली
हसता हसता रडण्याचे आज
कसब नवे शिकुन गेली

सर

सरसर सरसर धावुन येई सरींवर सर
दार नभाचे तोडुन कोसळते ती सर
करी त्रुप्त सुकल्या धरणीस ती सर
बरसता बरसता अचानक थांबते ती सर
पानाफुलातुन सर झाडावेलीतही सर
थेंबा थेबातही अबोल असतेच् रे सर
म्हटली तर मोठ्ठी म्हटलं तर् इवलिशी ती सर
कधी फाटते आभाळ कधी ओंजळित ती सर
सापडे अवचित दरीखोर्यातही सर
उंच उंच झाडाच्या तळाशीही सर
हळव्या स्वरांच्या गाण्यातही सर
पाण्यासरख्या आसवांचा पुर म्हणजे सर

खुप वाटते कधीतरी


खुप वाटते कधीतरी
मुसळधार पावसात चिंब भिजावं
खोटा खोटा पैसा देऊन पावसाला
पुन्हा पुन्हा बोलवावे

खुप वाटते कधीतरी
मनसोक्त गावं
आयुष्याचे सुर निसटले तरी
काहीतरी गुणगुणावं

खुप वाटते कधीतरी
जोरजोरात रडावं
मनातले दुःख
एकदातरी जगासमोर मांडावं

खुप वाटते कधीतरी
दूर करावी ही घुसमट
मोडून मनाची दार
तोडावी ही आयुष्याची चौकट

कितीही वाटले तरीही
खरचं हे शक्य असते?
नियतीला चुकवून पुन्हा खेळ मांडणं
खरच इतके कठिण असतं?

भाउ माझा

कसं सांगु सखे तुला
कसा माझा भाउ गं
मनानी जोडलयं हे नातं
तुला कसं समजावु गं
पुर्वजन्मीचं पुण्य समजु की
ह्या वेडीचं नशीब गं
रक्ताच्या नात्याहुनही
पवित्र हे नातं गं
सात सुरांच्या साथीने
रंगलेलं हे गाणं गं
आनंदाच्या सरींसवे
बरसणारा तो श्रावण गं
अनोळखी वाटेवरचा
हक्काचा तो आधार गं
प्रत्येक संकटात पाठीवरती
तो विश्वासाचा हात गं
काय सांगु अजुन सखे
तुझं तुच समज गं
शब्दात तरी कसं मांडु त्याला
ह्या वेडीचा तो भाउही वेडाच गं

आई


आई म्हणजे चैतन्य
आई म्हणजे उत्साह,
आई म्हणजे हास्य,
अन् आई म्हणजे कारुण्यही
लहानपणापासुन बघतेय तिला
पण आता जराशी समजतेय
माझी सगळ्यात जवळची हि मैत्रिण
मला आता कुठे उलगडतेय
मात्रुत्वाच्या उंबरठ्यावर
मला माझी आई कळली
नऊ महीने गर्भात सांभाळताना
बाळा मला ती आईपण शिकवुन गेली

पुन्हा एकदा त्याच वळणावर


पुन्हा एकदा त्याच वळणावर
त्याच आयुष्याची नवी सुरुवात
विसरता न येणारया भुतकाळासवे
नव्या निश्चयाची नवी रुजवात

पुन्हा एकदा अट्टाहास
ह्या जीवनाचा अर्थ समजण्याचा
जुन्याच प्रश्नांच्या भेंडोळ्यात
मग नवीन उत्तरं शोधण्याचा

प्रेमाची जादु


अनमिक ओढ आहे आज मनात
तुझी.... तुझ्या येण्याची
खुळावल्या ह्या मनाला आता
तुझ्या मिठीत सामावण्याची

हा पाउसही वेडा कसा
बेधुंद कोसळतोय...
आपल्या नात्याचं गुपित कळुन
जणु आनंदानं गातोय

वेडावले रे मी 
त्या तुझ्या स्पर्शाने
डोळ्यातुन माझ्या मनात डोकावणार्या
तुझ्या त्या नजरेने
  
प्रेमाची जादु तुझ्या 
हळुवार मनावर चढतेय
साता जन्माच्या शपथा घ्यायला
हे मनही आतुरतयं 
त्या दिवशी माझ फ़्रेंड
रडत रडत आला
माझा बाबा बाप्पाकडे गेला
म्हणत मला गच्च बिलगला
मीही हादरलो क्षणभर
अन सावरलोही क्षणात
असा कसा बाप्पा करेल म्हणत
हसलोही मनात
समजावलं त्यालाही असं नाही बाप्पा करणार
गम्मत केलि असेल तुझी
उद्या तुझा बाबा तुला नक्कि परत करणार
दिवस सरले
आठवणी विरल्या
माझ्या लहानश्या जगात
आता माझा बाबाच माझा सर्वस्व झाला
.
.
.
आज मात्र कोण जाणे
बाबा अजुन आला नाही
खाउ आणण्याचं प्रोमिस तो विसरणार तर नाही
दार वाजतय बहुदा बाबा आला
घाबरलेल्या शेजारच्या काकु
हे काय सांगताहेत
रेल्वेमध्ये म्हणे कोणी मोठा बोम्ब ठेवला
त्या बोम्ब्सोबतच बाबा माझा बाप्पाकडे गेला
अश्या कशा काकु खोटं बोलताहेत
ताइपण वेडी माझी टिहि ओक्सबोक्षी रडतेय
बाप्पाकडे त्याचा बाबा असताना तो माझ का नेइल
आईच्या कुशित शिरल्यावर मात्र सगळं काहि कळलं
वर बसलेला हा बाप्पा गंमत नसतो करत
एकदा घेउन गेल कि बाप्पा बाबा परत नसतो करत
“आई ए आई
सांग ना गं बाबांना
ह्या सुंदर जगात येण्याआधीच
नका ना काढून टाकु मला”
गर्भातली पोर् माझ्या आज
मनापासुन बोलात होती
नको गं मारु असे मला
म्हणुन मनापासुन कळवळत होती
पण कसं सांगु तुला बाळा
आज तुझा बापच तुझा वैरी झालाय
आजीच्या पदराआडुन वार करताना
तोही त्याच्या मनासारखंच करतोय
म्हणे त्यावर पिल्लु माझी
” नाही मी त्रास देणार बाबांना
राहीन नेहमीच आज्ञेत त्यांच्या
सांग ना ग त्यांना”
इंदिरा,कल्पना,लता
नाही होणार कदाचित
पण् गर्वाने बाबा म्हणवाल माझे
असे नक्किच करेल काहीतरी
तु नको रडुस आई पण एक सांगशील मला?
मुलीचा जन्म हा का गं गुन्हा झाला?
जिच्या गर्भातुन जन्म घेतला
त्या स्त्रिचा इतका का गं ह्या जगाला तिटकारा

my first poem


काहीतरी तुटतयं
काहीतरी जुळतयं
सगळं काही असताना
काहीतरी निसटतयं
सोबतीची उणीव
आज जाणवतेय
गर्दीतही आज
एकटेपण वाटतयं
आनंद,उत्साह,जल्लोष
सर्वदूर पसरतोय
मन मात्र माझं
असं एकाकी भरकटतयं
हेच आयुष्य हेच
जीवन समजायचं
नव्या उद्यापासुन
नवीन जीवन जगायचं

राहुन राहुन आज मन
भुतकाळात रमतय
होस्टेलच्या चार भिंतीत
मायेची उब शोधतय
उंबरठा ओलांडला घराचा
ध्येयाची क्षितीजं गाठायला
तेव्हा कुठे माहित होते
नंतर वाटच नसेल परतायला
आईच्या डोळ्यातल्या पाण्याची
कींमत आता थोडी उमजतेय
सगळं जग जेव्हा गिळायला येतय मला
तेव्हा तिच्या मनातली काळजी मला कळतेय
वेडी वाटतात ती स्वप्न आता
स्वतःच्या पायवर उभे रहण्याची
आइच्या पदराआड लपुन
हे जग जिंकण्याची
सगळं मिळतं म्हणे आज
पैशांच्या जोरावर
आईच्या कुशीची उब अन् बाबांचा आधार
कुठे मिळतो का ह्या कागदी नोटांवर

खरचं कळलं होतं का रे तुला

खरचं कळलं होतं का रे तुला
मला नक्की काय वाटत होतं?
प्रत्येक वेळी तुला टाळताना
मन पुन्हा पुन्हा तुला शोधत होतं
जग म्हणतं दोष माझा होता
फ़रफ़त तुझ्या आयुष्याची हा माझाच गुन्हा होट
माझ्या मनाची तगमग मात्र
कोणालाच का रे नहि कळली
खरच कळलं नाही का रे मला
तु माझ्यावर प्रेम करतोस
माझ्यासाठी आपलं आयुष्यं
आजही वात् पाहात घालवतोस?
सगळं सांगायचं होतं रे तुला
तुच होता मनात मझ्या…
तुला सगळं कळलं असलं तरी
व्यक्त करायच होतं एकदाच मला…..

आयुष्य


आयुष्य का असतं
असं असंख्य वळणावळणाचं
प्रत्येक नव्या वळणावर
जूनं अनोळखी करणारं
आयुष्य का असतं
जळलेल्या झाडासारखं
पुन्हा फ़क्त् एकदा फ़ुलण्यासाठी
पावसाची आशेने वाट पाहाणारं
आयुष्य का असतं
असं लव्हाळीच्या पात्यासारखं
कितीही वादळं आली तरी
चिकाटीने तग धरणारं
आयुष्य हे असचं का असतं
तळ्यातल्या पाण्यासारखं
स्वच्छ शांत पाण्यामध्ये
गढुळ मनाचं प्रतिबिंब दाखवणारं

निर्धार


सगळचं नेहमी मनासारखं होईल
अशी अपेक्षाच करायची नसते
मनातलं ते स्वप्न तुटलं म्हणुन
रडत बसायचं नसतं

अथांग समुद्रासारखं दुःख असलं
तरी सुखाच्या किनार्याला विसरायचं नसतं
आकाशाच्या निळाईला गवसणी घालताना
जमिनीवरच्या अस्तित्वाला विसरायचं नसतं

अपयश आलं म्हणुन
प्रयत्न करणं सोडायचं नसतं
नव्या वाटेवर नवी संकटं
म्हणुन चालणं सोडायचं नसतं

नशिब


नशिब नशिब तरी काय रे
घडवावं तसं घडतं
आयुष्यभर पाठलाग करुन कमावलेलं
एका क्षणात विखुरतं
तळहातावरच्या रेषामधे म्हणे
नशिबाच्या रेषा असतात
जोडिदारच्या नशिबासोबत म्हणे
त्याही जुळवुन घ्याव्या लागतात
आयुष्य पोहोचलं मध्यावर
अन् कशाचा काही पत्ता नाही
विचारलं स्वतःलाच कारण तर
म्हणे नशिबतच यश नाही