Wednesday, June 26, 2013

दोन दोन ओळी

मरण्याच्या लाख इच्छा जगण्याला कारण नाही 
ओंजळभर सुखास येथे वेड्या दुख:हि तारण नाही

विरू दे जरा उसासे उध्वस्त त्या क्षणांचे 
फिरुनी वसेल तेथे बघ गाव नव्या स्वप्नांचे

न भटक ए राही खामखा इस खुदी के तलाश मे 
सुना है बडी खौफनाक दिखती है जिंदगी आईनेमे

न खोज ए परिंदे इस भीड कि धडकने
मुर्दोन्का शहर ये यहा बिकती है सांसे

कूछ भी तो नही बदला है यहा
फिर भी अंजान लगता है 
.....यह शहर...

आकाशीचा चंद्रमा कधी येईल का गं अंगणी ?
रातराणीच्या गंधासवे कधी मोहोरेल गं चांदणी?

घडु दे आता नव्याने संवाद मीपणाशी
लागु दे संदर्भ काळाचे ह्या गोठलेल्या मौनाशी

बेवजह हि बदनाम शहर कि वो रंगीन गलीया
बेनाम रिश्तोको अंजाम देती है वो अंधेरी गलीया

चारोळ्या


मुष्कील ही नहीं,नामुमकीनसा लगता है दिल का धडकना कभी..
भीड तो बहाना बस, खुदी की तलाश में भटकती हैं खामोश सांसे कभी..

ऐन मृत्युघटकेला पुन्हा,जीव हवासा वाटतो
मिटल्या पापणीआडचा तोच,गतजन्म नवासा वाटतो

यही किसी मोड पे कही संभल के रखी थी जिंदगी
रोज पुरवून पुरवून वापरायची असं कधीचं ठरलं होतं

जरी चार पावलांचाच
होता प्रवास अवघा
प्रत्येक श्वासाचा तरीही
इथे सोहळा होतो

न धडक बेवजह ए दिल उसके आने की कोइ आहट नहीं
खुले दरवाजेसे बस ताकती है परछाईया अंधेरेसे कोई मिलता नहीं

बडे चावसे हर चौराहे पे आजकल बिकती है उम्मीदे
कल की हि पुरानी,बासी फिर भी रोज नईसी उम्मीदे

सुना है, बिगडी तकदीर भी सिने से लिपट जाती है कभी ...
थमेसे दिल कि धडकने क्या उसे भी सुनाई देती है?

कडी धूप मे जब साये साथ छोड जाते है... 
भरी भीड मे जब तन्हाई छु जाती है..
अंधेरा तब मेहसूस होता है... 
आगे जाने का डर जब अतीत में खिचता है... 
थमीसी धडकनो के बीच दौडती रुह 
जब जिंदा होने का सबूत मांगती है
अंधेरा तब मेहसूस होता है...

पैगाम तो कई भेजे खुदा ने... 
बंदा जिंदगी मे मश्गुल था...
समझी ये दुनियादारी जब
आंखोमे बस उसीका इंतजार था..

मन गढूळ गढूळ 
घेई शोध अंधारचा
चमचमत्या पाणवठ्यावर 
त्यास भास काजव्यांचा

Friday, June 14, 2013

पाणावलेला पाउस

पाउस म्हणजे,
चिंब ओली माती,
इंद्रधनुच्या रंगामध्ये
चमचमणारं पाणी

पाउस म्हणजे...
गळकं छप्पर, शेवाळलेल्या भींती
वीजांच्या प्रकाशात
लख्ख उजळलेली  भीती

पाउस म्हणजे
झिम्माड... ओला ओघ
रिमझिमणार्या आठवांचा
हवाहवासा मेघ..

पाउस म्हणजे
चिखल..भांबावलेल्या जगण्याचा
नकोनकोश्या भूतकाळामधे
घुटमळणार्या वर्तमानाचा..

पाणावलेल्या डोळ्यांचा पावसाळी वस्तीतला पाउस...