Saturday, August 23, 2014

काळ्याभोर आभाळाइतके असतो आपण नसतो आपण 
ढगफुटीचे नेमके कारण स्मरता कोरे कोरे उरतो आपण

नवथर फुलावर पांघर दवाचा ,तसा बोलतो स्पर्श
प्राजक्त गंधाळल्या रात्रीस अलवार गोंजारतो स्पर्श

वांझोट्या कुशीत दुःखाचीच बीजे
कोवळ्या अंतरावर सुख विसावते

काळ्या ढगांच्या कोंदणातुन, निर्मळ रिमझिमतो अंधार 
तळहातावर शुभ्र सर, कवडश्यांशी कुजबुजतो अंधार

किती सरींचे कौतुक वेड्या,किती वळीवास भाव
कोरड कोरड पापणीत वसले ओल्या पावासाचे गाव