Saturday, August 23, 2014

काळ्याभोर आभाळाइतके असतो आपण नसतो आपण 
ढगफुटीचे नेमके कारण स्मरता कोरे कोरे उरतो आपण

नवथर फुलावर पांघर दवाचा ,तसा बोलतो स्पर्श
प्राजक्त गंधाळल्या रात्रीस अलवार गोंजारतो स्पर्श

वांझोट्या कुशीत दुःखाचीच बीजे
कोवळ्या अंतरावर सुख विसावते

काळ्या ढगांच्या कोंदणातुन, निर्मळ रिमझिमतो अंधार 
तळहातावर शुभ्र सर, कवडश्यांशी कुजबुजतो अंधार

किती सरींचे कौतुक वेड्या,किती वळीवास भाव
कोरड कोरड पापणीत वसले ओल्या पावासाचे गाव

Wednesday, July 23, 2014

दिस टांगून वेशीला रात सोबतीस आली
उंबर्यात अडखळता सांज रात अंगणात घुटमळली

असण्याने नव्हता लाभ कुणा ,अन् नसण्याची तर खंतही नाही 
अस्पृश्यतेचा शाप चौकाला ,भरगच्च गर्दीचे सोपे वरदान नाही

दिन की बिदाई करते करते पता नही कैसे आजकल रात बीत जाती है,खोइ हुई रंगीन शाम हररोज बंद दरवाजेसे ही मिलती है

तुझ्या गंधाळल्या श्वासाचा उभ्या देहाला मोहोर

Tuesday, February 18, 2014

charoli

जरा अनावर होता
जेव्हा बंध दरवळ होतो
चोरट्या त्या कटाक्षांचा
तेव्हा अवखळ बोभाटा होतो

ऐन सांजेच्या उंबर्यात ओढ उपरेपणाची
रात्रीच्या ओल्या गर्भात जाग वांझोट्या स्वप्नांची

निरोपाच्या वळणावरचे टाळलेले स्पर्श
हुरहुरत्या श्वासांच्या लयीत गंधाळलेले स्पर्श

कधी भैरवी कधी मारवा
सूर मनाचा सांगून जातो
ओंजळीत गंधाळलेले
कोवळे नाते देउन जातो

इतना भी कहां हम अपने खुदाको चाहते है
मौत की कगारपे तो उसके मुलाकात से डरते है

तेरे होने की जब आहट भी नहीं थीं
ए खुदा जिंदगी तब भी इतनी मुश्किल तो नहीं थीं

कई अरसों बाद बस्स मुलाकात हुई हैं खुदसे
एक पलमें कहाँ वैसे जिंदगी की तलाश खत्म होती हैं

खरं सांग शिल्लक किती देवा जुनी पाप पुण्य
नव्या प्राक्तनांना उगा जुन्याचे आता अडसर नको

किसकी बगावत हैं ये क्या पता ए खुदा
अजनबी भीड़ का चेहरा रोज आइने में जो दिखता हैं

लाख असतील गोठलेली स्वगते जरी मौनातली
हळव्या नाजूक हुंकाराची तरी सांग भाषांतरे केली कुणी

ना लख्ख प्रकाशाचा ना मिट्ट काळोखाचा असतो
खरा प्रश्न नेहमीच फक्त मिणमिणणारा असतो