Tuesday, February 18, 2014

charoli

जरा अनावर होता
जेव्हा बंध दरवळ होतो
चोरट्या त्या कटाक्षांचा
तेव्हा अवखळ बोभाटा होतो

ऐन सांजेच्या उंबर्यात ओढ उपरेपणाची
रात्रीच्या ओल्या गर्भात जाग वांझोट्या स्वप्नांची

निरोपाच्या वळणावरचे टाळलेले स्पर्श
हुरहुरत्या श्वासांच्या लयीत गंधाळलेले स्पर्श

कधी भैरवी कधी मारवा
सूर मनाचा सांगून जातो
ओंजळीत गंधाळलेले
कोवळे नाते देउन जातो

इतना भी कहां हम अपने खुदाको चाहते है
मौत की कगारपे तो उसके मुलाकात से डरते है

तेरे होने की जब आहट भी नहीं थीं
ए खुदा जिंदगी तब भी इतनी मुश्किल तो नहीं थीं

कई अरसों बाद बस्स मुलाकात हुई हैं खुदसे
एक पलमें कहाँ वैसे जिंदगी की तलाश खत्म होती हैं

खरं सांग शिल्लक किती देवा जुनी पाप पुण्य
नव्या प्राक्तनांना उगा जुन्याचे आता अडसर नको

किसकी बगावत हैं ये क्या पता ए खुदा
अजनबी भीड़ का चेहरा रोज आइने में जो दिखता हैं

लाख असतील गोठलेली स्वगते जरी मौनातली
हळव्या नाजूक हुंकाराची तरी सांग भाषांतरे केली कुणी

ना लख्ख प्रकाशाचा ना मिट्ट काळोखाचा असतो
खरा प्रश्न नेहमीच फक्त मिणमिणणारा असतो

No comments:

Post a Comment