जरी जाणिवांचा जीवाला दिलासा
तुझ्या आठवांचा आताशा भरोसा कुठे?
असा कसा रे उन्हाळी रंग होतो पावसाचा
काळ्याकुट्ट आभाळाच्या घुसमटीत का रे खेळ श्रावणाचा
तिच्यासाठी की तिच्याशिवाय
त्याने त्याचं खुशाल ठरवावं
जाता जाता वळून फक्त
"येतो गं" म्हणणं टाळावं
निळ्याभोर आभाळाचा चल एक तुकडा उधार मागु
अवघडलेल्या स्वप्नांसाठी एकदा हेही करून पाहू
सुना है यही किसी चौखटसे रोज जनाजें निकलते हैं..ख्वाबोंके..
वरना गली के मोडपे कोई यूही तो न रूकता..ख्वाब सस्तेमे बेचते..
किती क्षणांचे किती मणांचे किती अनावर नाते
जुन्या भेटीचे जुनेच धागे, नव्या अर्थास आतूर नाते
पैलतीराचा नाद तुझा अन् एैलतीराचे बंध
अधांतरी श्वासांस तुझ्या अवखळ मावळ गंध
ओळखीच्या उन्हांची सावली अनोळखी
एकजाती वेदनेची आर्तता अनोळखी
शांत कर आता तुझ्या मशाली
बघ पुरेसा हाही संहार झाला
No comments:
Post a Comment